राज्य दुष्काळात पण, वॉटरपार्कमध्ये धो-धो पाण्याची नासाडी !

March 23, 2016 3:25 PM0 commentsViews:

Shirdi Waterpark

शिर्डी-23 मार्च :  राज्यातील जनता सध्या भीषण पाणी टंचाईने त्रस्त आहे. वणवण भटकून आपल्या लेकरांची तहान भागवण्यासाठी महिला दाहीदिशा भटकत आहेत, त्यांना पाणी मिळत नाही. मात्र, मौजमजा करण्यासाठी मुबलक पाणी आहे. राज्यातील शेकडो वॉटर पार्कमध्ये दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होतेय. मात्र, सरकार याकडे डोळेझाक करतंय.

शिर्डीमध्येही असाच एक भव्य वॉटरपार्क आहे. हजारो लोक दररोज याठिकाणी मौजमजा करण्यासाठी येत आहेत. पाणी उधळून यांना थोडा वेळ आनंद जरी मिळत असला तरी राज्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करते आहे, हे या लोकांनी जाणून घ्यायला हवं. आज शिर्डीला 8-10 दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते आहे. मात्र याच शिर्डीत आणि राज्यातील इतर वॉटर पार्कमध्ये हजारो लीटर पाण्याची नासाडी सुरू आहे. यासंदर्भात IBN लोकमतने पाठपुरवठा केल्यानंतर जलसंपदा मंत्र्गिरीष महाजन यांनी राज्यातील वॉटरपार्कवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close