साखरेच्या भावाचे खापर राज्य सरकारवर

March 18, 2010 9:49 AM0 commentsViews: 8

18 मार्चसाखरेच्या किमतींवर शरद पवार पुन्हा बोलले आहेत. आणि यावेळी त्यांनी साखरेच्या वाढत्या भावाचे खापर राज्य सरकारांवर फोडले आहे. राज्य सरकार मला उसाच्या उत्पादनाचे चुकीचे आकडे देत होते. राज्यांनी माझी दिशाभूल केल्यानेच हे संकट उभे राहिले, असे पवार म्हणाले. पण त्यांनी कोणत्याही एका विशिष्ट राज्याचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख मात्र उत्तर प्रदेशाकडे होता. उत्पादनाचे आकडे मोजण्यासाठी नवी पद्धत अमलात आणण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. खरीप पिकाची आखणी करण्यासाठी आज कृषिमंत्रालयाची एक परिषद झाली. त्यावेळी पवार बोलत होते.

close