मंत्रालयाच्या अधिकार्‍यांचा प्रताप, सुखदेवांच्या जागीही भगतसिंगांचाच लावला फोटो

March 23, 2016 4:43 PM0 commentsViews:

mantralya_34534मुंबई – 32 मार्च : आज शहीद दिवस….शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे क्रांतिकारक स्वातंत्र्याचा जयघोष करत आजच्याच दिवशी फासावर चढले होते..आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात या शहीद वीरांना मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अधिकार्‍यांनी श्रध्दांजली अर्पण केली. मात्र, यावेळी शहिदांचे जे फोटो ठेवण्यात आले होते त्यात शहीद सुखदेव यांच्या फोटो ऐवजी भगतसिंगांचाच फोटो दुसर्‍यांदा लावण्याचा पराक्रम मंत्रालयाच्या कर्मचार्‍यांनी केलाय. दोन फोटो हे भगतसिंगांचेच लावण्यात आले.

यावरून अधिकारी किती निष्काळीपणे काम करतात हे स्पष्ट होतं. शहिदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम…त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार असा महत्वाचा कार्यक्रम असताना अधिकार्‍यांना त्याचं गांभीर्य नसावं याबद्दल हे अतिशय संतापजनक आहे. अधिकार्‍यांना किमान सामान्य ज्ञान असू नये का असाही प्रश्न विचारण्यात येतोय. या प्रकरणी आमदार बच्चु कडू यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close