विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा

March 18, 2010 9:58 AM0 commentsViews: 2

18 मार्चआजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. वेब कॅमेर्‍याद्वारे फोटो पास काढून व्हिजिटर्सना विधानभवनाच्या आवारात प्रवेश दिला जाणार आहे. विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पोर्चपर्यंत कोणतीही वाहने येणार नाहीत. सर्व मान्यवरांना विधान भवनाच्या इन गेटपासून चालत प्रवेश करावा लागेल. इतर अत्यावश्यक वाहने मागच्या दाराने आतमध्ये येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

close