पोलीस स्टेशनमधून कैदी पळाले

March 18, 2010 10:02 AM0 commentsViews: 4

18 मार्चपालघर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पाच कैदी पळाले आहेत. हे पाचही जण झाबूवा गँगशी संबंधित होते.मध्यरात्री कोठडीच्या मागच्या बाजूची कौले काढून त्यांनी पळ काढला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ते जवळच्याच लोकमान्य पाड्याच्या दिशेने पळून गेले. यामध्ये उदयसिंग बेबूरीया, बासू बेबूरीया, अब्रू मँगो बेबूरीया, बापूसिंग सिंगाड आणि राजू मेधा यांचा समावेश आहे. पोलिसांनी रात्री पासूनच तपास सुरू केला आहे. या पाचजणांना पालघर आणि बोईसर पोलिसांनी नुकतेच पकडले होते.

close