भारताचा रोमांचकारी विजय, बांगलादेशचा फक्त 1 रनने पराभव

March 23, 2016 10:10 PM0 commentsViews:

CePsBU0W8AEqIpI

22 मार्च :  टी- 20 वर्ल्डकपमध्ये अखेरच्या बॉलवर थरारक विजय मिळवून भारताने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 रन्सची गरज असतांना धोनीने प्रसंगावधान राखून मुस्तफिझूर रहमानला रनआऊट करत 1 रन्सने भारताला विजय मिळवून दिला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांग्लादेशने चांगली सुरुवात केली. बांगलादेशचे पहिले विकेट मोहम्मद मिथुनच्या रुपाने 11 धावसंख्येवर गेले. शाकिबने 22 रन्स केल्या आश्विनच्या गोलंदाजीवर रैनाने स्वीपमध्ये त्याचा झेल टिपला. परंतु, बांगलादेशने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. अखेरच्या विजयासाठी 11 धावांची गरज होती. डावाचे अखेरचे ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने टाकले. त्यात मुशफिकूर रेहमानने 2 चौकार मारुन बांगलादेशला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. पण त्याला आणि मेहमदुल्लाला पांड्याने बाद करुन सामना भारताच्या बाजुने झुकवला.

बांगलादेशाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 146 रन्स केले. भारताने सुरूवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सावध सुरुवात केली. पण, सहाव्या ओव्हरमध्ये रोहित (18), सातव्या ओव्हरमध्ये (23) शिखर धवन, 14 व्या ओव्हरमध्ये विराट कोहली (24), 16 व्या ओव्हरमध्ये सुरेश रैना (30), तर हार्दिक पांड्या (15) , 17 व्या ओव्हरमध्ये युवराज सिंह (3) तर शेवटच्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा (12) बाद झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close