मनसेच्या निलंबित आमदारांचे आंदोलन

March 18, 2010 10:08 AM0 commentsViews: 2

18 मार्चमनसेच्या चार निलंबित आमदारांनी आज आपल्या निलंबनाच्या विरोधात विधानभवनासमोर आंदोलन केले. हे चार आमदार काळे कपडे घालून बग्गीतून आमदार निवासापासून विधानभवनापर्यंत आले. निलंबन रद्द करावे किंवा ते कमी करावे यासाठी या आमदारांनी अनोख्या पद्धतीने हे आंदोलन केले. या अधिवेशनात या आमदारांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे. तसे संकेत गेल्या काही दिवसात सत्ताधारी आणि विरोधकांकडून मिळत आहेत.

close