सायना जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये

March 18, 2010 10:34 AM0 commentsViews: 1

18 मार्चबॅडमिंटनपटू सायना नेहवालने एक नवा इतिहास रचला आहे. ऑल इंग्लंड सुपर सीरिजच्या सेमीफायनलपर्यंत धडक देत सायनाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. ऑल इंग्लंड सुपर सीरिजच्या क्वार्टर फायनलमध्ये सायनाने जर्मनीच्या ज्युलिएन शेंकचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता आणि सेमीफायनल गाठली होती. पण सेमीफायनलमध्ये डेन्मार्कच्या टिन रेसमुसेनने तिचा 21-19, 21-17 असा पराभव केला. याअगोदर ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलपर्यंत आणि वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशीप जिंकणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.

close