टोलनाक्यावरच्या कर्मचार्‍यांना टोल चुकवणार्‍यांची धास्ती!

March 24, 2016 5:41 PM0 commentsViews:

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई
24 मार्च :  गेल्या अनेक वर्षांपासून टोलच्या बातम्या आपण पाहत आहोत. टोलविरोधातली आंदोलनं आपण पाहिली. पण टोल नाक्यांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांबद्दल फारसं कुणी बोलत नाही. टोल वसूल करणारे म्हणून त्यांच्याकडे लोक रागानेच बघतात. पण खरं तर ते पगारदार नोकर असतात आणि त्यांचं काम करताना त्यांना अनेकदा जीवावर बेतणारी जोखीम पत्करावी लागते.

TOLL BANNER

ही कोणती पद्धत आहे टोल नाकारण्याची… जरा नीट बघा या चारही अपघातांकडे. हे चारही अपघात दहिसर टोलनाक्यावर घडलेत.

पहिला अपघात- 18 सप्टेंबर 2015

दुसरा अपघात- 28 सप्टेंबर 2015

तिसरा अपघात- 11 ऑक्टोबर 2015

चौथा अपघात- 25 ऑक्टोबर 2015

ही परिस्थिती आहे फक्त एका टोल नाक्यावरची. विचार करा मुंबईतले 5 एन्ट्री पॉॅंट्स आणि ठाणे, नवी मुंबई, कल्याण मध्ये काय परिस्थिती असेल.

दरमहिना साडे आठहजार रुपये पगारावर काम करणार्‍या या कर्मचार्‍यांना जेव्हा अपघातापायी पाय गमवावे लागातात तेव्हा विचार करा की कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढावत असेल. यातले अनेक तरुण कंत्राट पद्धतीने काम करत असल्याने त्यांना कंपनीकडून विमा किंवा आर्थिक मदतही मिळत नाही. प्रत्येक टोल नाक्यावर दिवसात किमान एक अशी घटना घडते. आयबीएन लोकमतच्या कॅमेरात पण अशी घटना टिपली गेली.

लोकांना टोलविषयी राग येण स्वाभाविक आहे. पण पगारी कर्मचार्‍यांचे हातपाय तोडून टोल रद्द होणार नाहीये.

अन्यायकारक टोलला विरोध करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पण टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांच्या अंगावर गाडी घालून ही समस्या सुटणार आहे का, याचा विचार सर्वांनी करायला हवा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close