कन्हैय्याला बोलावले तर ठोकून काढू, ‘रानडे’च्या विद्यार्थ्यांना धमकी

March 24, 2016 9:44 PM0 commentsViews:

पुणे – 24 मार्च :  कन्हैया कुमारला कॅम्पसमध्ये आणलं तर आयोजकांना ठोकून काढू, अशी धमकी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला दिल्याची तक्रार रानडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. तक्रारीचा अर्ज त्यांनी डेक्कन पोलिसांकडे दिला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येते आहे.

विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे दिलेल्या अर्जामध्ये, काल (बुधवारी) भाजयुमोच्या ओंकार कदम यांनी रानडेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना धमकावले. जर कन्हैया कुमारला पुण्यात आणणार असाल, तर ठोकून काढू. ज्याला कन्हैया कुमारचे विचार ऐकायचे असतील, त्यांनी दिल्लीला जावं. पुण्यात कार्यक्रम केला तर आयोजकांना पकडू, अशी धमकी त्याने दिल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या धमकीमुळे आम्हाला आमच्या जीविताची काळजी वाटते, असंही रानडेच्या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close