शत्रुघ्न सिन्हांची टीम गडकरीवर टीका

March 18, 2010 10:39 AM0 commentsViews: 4

18 मार्चभाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गडकरी यांच्या नव्या टीमवर जोरदार टीका केली आहे. पात्रता असलेल्या नेत्यांना टीममधून वगळण्यात आले आहे. बिहार विधानसभा निवडणूक तोडांवर असताना यशवंत सिन्हा यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांना कार्यकारिणीत स्थान मिळाले नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यासोबतच पात्रता नसणार्‍या बर्‍याच जणांची वर्णी कार्यकारिणीत लावण्यात आल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. मी स्वत: कोणत्याच पदाच्या स्पर्धेत नव्हतो, असही त्यांनी स्पष्ट केले आहे.

close