पाणी पिण्यासाठी नदीत उतरलेल्या दोघा बहिणींचा मृत्यू

March 24, 2016 7:37 PM0 commentsViews:

Solapur

सोलापूर – 24 मार्च :  सोलापूरमध्ये पाणी पिण्यासाठी नदी पात्रात उतरलेल्या दोन सख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दक्षिण सोलापूरातील कुसुर गावातल्या भीमा नदीत ही दुदैर्वी घटना घडली आहे.

रुक्मिणी आणि यशोधरा लोहार असं नदीपात्रात बुडालेल्या बहिणींची नावं आहेत. वाळू उपसासाठी नदीपात्रात 15-20 फुटांचे खड्डे आहेत. अनेक ठिकाणी खड्डे करून ठेवल्यामुळे त्या दोघी खड्यात अडकल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close