पीडीपीच्या अध्यक्षपदी मेहबूबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड

March 24, 2016 6:12 PM0 commentsViews:

mehbooba-mufti_650x400_61452228046

24 मार्च :  पीपल्स डेमोपेटीक पक्षा(पीडीपी)च्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची आज पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक आज (गुरूवारी) दुपारी मुफ्ती यांच्या घरी घेण्यात आली होती. बैठकीतच अध्यक्षपदाचा निर्णय घेण्यात आला. नियुक्तीनंतर मुफ्ती म्हणाल्या, आमच्या पक्षात एकसंघ आहे. सर्वानुमते मला पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. तसंच सत्ता स्थापनेबाबत लवकरच निर्णय घेणार, याकडेही मुफ्तींनी लक्ष वेधल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 

close