शेट्टी खून प्रकरणाचा अहवाल हायकोर्टात सादर

March 18, 2010 10:46 AM0 commentsViews: 2

18 मार्च पुणे ग्रामीण पोलिसांनी सतीश शेट्टी खून प्रकरणाचा अहवाल आज हायकोर्टात सादर केला. पण हा अहवाल तपासाच्या दृष्टीने सांगितलेल्या महत्वाच्या संस्था आणि व्यक्तींचा तपास न करताच सादर केला गेला. यावर नाराज होऊन सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी हायकोर्टात प्रतिज्ञा पत्र सादर केले. त्यात त्यांनी आय.आर. बी. आणि नितीन साबळे यांच्यावर शंका व्यक्त केली आहे. त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

close