IBN लोकमत इम्पॅक्ट : दापोली वाळीत प्रकरणी अखेर 5 जणांना अटक

March 25, 2016 12:21 PM0 commentsViews:

Dapoli1213रत्नागिरी – 25 मार्च : दापोली मधल्या देहेण वाळीत प्रकरणी अखेर 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दापोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आणखी काही जणांना या प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

देहेण गावात एका कुटुंबियावर जातपंचायतीच्या सदस्यांनी 5 वर्षांपासून बहिष्कार घातला होता. या कुटुंबातील वृद्ध महिलेचं निधन झालं होतं. पण जातपंचायतीच्या जाचामुळे या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही पुढे मदतीसाठी पुढे येत नव्हतं. अखेर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या महिलेवर16 तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी 17 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 5 जणांना अटक केली आहे. उरलेल्या इतरांना आज अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दापोली पोलीस देहेण गावाकडे रवाना झाले आहेत. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा अहवाल मंत्र्यांना सादर करणार आहेत. दरम्यान, आज पालकमंत्री रवींद्र वायकर देहेणला भेट देणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close