फर्ग्युसनमध्ये देशविरोधी घोषणाबाजी नाहीच, विद्यार्थ्यांना क्लीन चिट

March 25, 2016 2:42 PM0 commentsViews:

fergusson-college-759

पुणे – 25 मार्च : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज घोषणाबाजी प्रकरण सर्व विद्यार्थ्यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या नाही असं पोलीस तपासात उघड झालं आहे. तर मनुवाद आणि समाजवाद यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या होता, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये मंगळवारी जेएनयूच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष अलोक सिंहचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अलोक सिंह फर्ग्युसन कॉलेजमध्ये आला होता. परवानगी नसताना हा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. मात्र आंबेडकरी चळवळीच्या विद्यार्थ्यांनी अभाविपविरुद्ध घोषणाबाजी करत कार्यक्रमाला विरोध दर्शवला. तर जेएनयू विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि रोहित वेमुलाच्या समर्थनातही घोषणाबाजी केली. पण कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्याच्या एका गटाने देशविरोधी घोषणा दिल्या असून त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई करा, असं पत्र प्राचार्यांनी डेक्कन जिमखाना पोलिसांना लिहिलं. या प्रकरणावरून भरपूर राडा झाल्यानंतर बुधवारी प्राचार्यांनी, विद्यार्थी देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास कारवाई करा असं म्हणायचं होतं. आपण पोलिसांना लिहिलेल्या पत्रात प्रिंटिंग मिस्टेक झाल्याचं सांगत त्यांनी यू टर्न घेतला होता आणि या संदर्भातील तक्रार मागे घेतली होती.

दरम्यान डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close