कृष्णाकडून ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर सर

March 18, 2010 11:23 AM0 commentsViews: 2

18 मार्चभारताची पहिली महिला एव्हरेस्टवीर कृष्णा पाटीलने अजून एक उत्तुंग शिखर पार केले आहे. कृष्णाने नुकतेच 2 हजार 228 मीटर उंचीचे ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर माऊंट कोझुस्को सर केले आहे. याअगोदर तिने आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकामधील सर्वात उंच शिखरे सर केली आहेतजगातील सात खंडांतील सर्वात उंच शिखरे सर करण्याचा कृष्णाचा मानस आहे. यानंतर आता युरोप आणि उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखरे सर करण्याचे तिचे ध्येय आहे. ही सातही शिखरे तिने सर केली तर सेव्हन समिट करणारी दक्षिण आशियातील ती एकमेव महिला गिर्यारोहक ठरेल.

close