बाबासाहेबांचं भव्य स्मारक व्हावं, ‘तडवळा’करांची मागणी

March 25, 2016 4:30 PM0 commentsViews:

उस्मानाबाद- 25 मार्च : जिल्ह्यातील तडवळा गावाला एक ऐतिहासिक ओळख आहे. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा मूलमंत्र देऊन जगभर एक चळवळ उभी केली होती. पण या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी तडवळा गावचे ग्रामस्थ करतायेत.

osmanabad_tadwalaउस्मानाबादमधलं तडवळा हे 10, 000 लोकवस्तीचे गाव. गाव तसं लहान आहे , पण या गावाला इतिहासात मोठं नाव आहे. घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच तडवळा गावात एक दिवस मुक्काम केला होता. 23 फेब्रुवारी 1941 ला जातीपातींच्या भिंती पाडण्यासाठी बाबासाहेबांनी इथं एक परिषद घेतली होती. गावकर्‍यांनी बाबासाहेबांची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. ही ऐतिहासिक आठवण असलेल्या तडवळामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशी गावकर्‍यांची अनेक वर्षांची मागणी आहे.

ज्या बैलगाडीतून बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली होती. ती बैलगाडी आजही गावकर्‍यांनी जपून ठेवलीय. दरवर्षी 14 एप्रिल म्हणजेच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त याच बैलगाडीतून त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या गावाला शिक्षणाचं मूलमंत्र दिला होता. बाबासाहेबांचा तोच आदर्श पुढे ठेवत या गावातल्या लोक शिक्षण घेऊन मोठे झाले. उच्चशिक्षित लोकांचं गाव अशीही या गावाची ओळख आहे.

तडवळा गावातल्या ज्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक रात्र मुक्काम केला होता. त्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा
अशीही मागणी होतेय. या गावाला अनेक नेत्यांनी, मंत्र्यंानी भेट दिलीय. पण, आश्वासनांपलीकडे या गावाला काहीच मिळालं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close