तृप्ती देसाईंचा पुन्हा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात

March 25, 2016 4:16 PM0 commentsViews:

Trupti desai21

नाशिक – 25 मार्च : भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना स्थानिक महिलांनी विरोध दर्शवत त्यांची गाडी अडवली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाल्यानंतर, पोलिसांनी तृप्ती देसाई आणि इतर आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. याआधीही तृप्ती देसाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यातच रोखलं होतं.

आज सकाळी महिलांसह देसाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केला. यावेळी महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळवा, यासाठी महादेवांकडे साकडे घातलं असल्याचं तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलतात सांगितलं आहे. देसाई यांनी मंदिरात प्रवेश केल्याचा स्थानिक महिला एकत्र येत या घटनेचा निषेध केला.

दरम्यान, भूमाता ब्रिगेडने यापूर्वी शनिशिंगणापूर येथील चौथार्‍यावर महिलांना प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन केले होते. आता त्र्यंबकेश्वरमधील मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close