मुंबई सराफा असोसिएशनच्या सदस्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

March 25, 2016 7:32 PM0 commentsViews:

raj-thakre-3

मुंबई – 25 मार्च :  यंदा बजेटमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर वाढीव एक्साईज ड्युटी लावण्यात आली आहे. केंद्रातील भाजप सरकारने वाढवलेल्या या अनाठायी कराविरोधात बेमुदत संप पुकारलेल्या सराफांनी आज शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणं त्यांच्यासमोर मांडलं. यावेळी मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने भाजपला मतदान करून चूक केल्याचे कबूल करत ‘एक ही भूल, भाजप का फूल’ अशा घोषणा दिल्या.

यावर राज ठाकरे यांनी न्याय मिळत नाही तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा सराफांना सल्ला दिला. त्याचबरोबर, सणासुदीच्या काळतही दुकाने बंद ठेवा, कारण नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणालं.

दरम्यान, सराफांच्या देशव्यापी बंदला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ज्वेलर्सची दुकाने बंद असून, सरकारकडून आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप सराफांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close