पाकिस्तान वर्ल्डकपबाहेर, रविवारी भारत-ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

March 25, 2016 8:05 PM0 commentsViews:

Pakistan Knoout

25 मार्च : टी-20 वर्ल्डकपमधून पाकिस्तानचं आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. मोहालीच्या स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला 21 रन्सनी पराभवला सामोरं जावं लागलं.

‘ब’ गटात पाकिस्तानचे चारही सामने संपले असून, केवळ बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानच्या टीमला विजय मिळवता आला. त्यामुळे पाकिस्तानच्या टीमला ‘ब’ गटात फक्त दोन गुणांसह तिसरं स्थान मिळालं आहे. पहिल्या स्थानवर असलेला टीम न्यूझीलंडने 6 गुणांसह सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे, तर भारताच्या खात्यात 2 विजयांसह 4 गुण जमा झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानला आजच्या सामन्यात स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय आवश्यक होता. मात्र पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताची पंचाईत झाली आहे. आत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारा सामना टीम इंडियाला जिंकावा लागेल कारण हा सामना सेमी फायनलसारखाच होणार आहे. या सामन्यात जो जीता वही सिकंदर अशी स्तिथीनिर्माण झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close