संमेलनाला युरोपचे वेध

March 18, 2010 1:09 PM0 commentsViews: 1

18 मार्चअमेरिकेतील सॅनफ्रॅनिस्कोनंतर दुबईत पार पडलेल्या दुसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनानंतर आता मराठीची पताका ब्रिटिशांच्या भूमीत फडकावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तिसर्‍या विश्व साहित्य संमेलनासाठी इंग्लड आणि कॅनडातून निमंत्रण आले आहे. त्याबाबतचा निर्णय 25 मार्चला घेतला जाणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 25 मार्च रोजी होणार्‍या बैठकीत एक ठराव मांडण्यात येणार आहे. साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची मुदत 30 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे लंडनच्या संमेलनाची सर्व सूत्रे नव्या अध्यक्षांच्या हाती असणार आहेत.

close