पश्चिम महाराष्ट्रानं विदर्भाचा पैसा चोरला- श्रीहरी अणे

March 26, 2016 3:48 PM1 commentViews:

 

मुंबई – 26 मार्च : विदर्भाच्या खिशातले पैसै महाराष्ट्राने चोरलेत असा आरोप करत आपण अजूनही वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचं पुनरूच्चार श्रीहरी अणे यांनी केला आहे. महाधिवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर श्रीहरी अणे पहिल्यांदाच नागपुरात आले होते. विदर्भवादियांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर अणेंनी घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.

Aney123

विदर्भाच्या वाट्याचे पैसे पश्चिम महाराष्ट्राने कायमच चोरले. विदर्भ वेगळा झाला तर ते पैसे त्यांना मिळणार नाहीत त्यामुळेच त्यांचा विरोध आहे. त्यांच्या भल्यासाठी विदर्भ वेगळा होऊन काय खाणार असा सवाल करतात पण मी म्हणतो, आम्ही काय खावू याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमचा विचार करा, असा घाणाघात श्रीहरी अणे यांनी केला.

यशवंतरावपासून ते पृथ्वीराज चव्हाणापर्यंत कुणीही विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही. दरवर्षी विदर्भाचा अनुशेष उर्वरित महाराष्ट्रात वळविला जातो. राज्यपालांनी आदेश देऊनही विदर्भाला हा निधी दिला जात नाही, असं अणे आपल्या भाषणात म्हणाले. एवढचं नाही तर, विदर्भाप्रमाणे मराठवाड्यावरही अन्याय होत आला आहे. म्हणूनच मी मराठवाडाही स्वतंत्र झाला पाहिजे असे मत मांडलं. तर औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे माझे पाय तोडू म्हणतात पण ते जाऊ द्या. ते माझे पक्षकार आहेत. अगदी बाळासाहेबही होते. पण ती त्यांची भूमिका नसून शिवसेनेची आहे. सरकार फार काही करू शकत नसल्याची स्थिती आहे. मराठवाड्यात शेती करायला सोडा प्यायला पाणी मिळत नाही यावरून स्थिती पाहा. विदर्भात धरणे का बांधली गेली नाहीत. शेतकर्‍यांना तर वार्‍यावरच सोडून दिले आहे अशी टीका अणेंनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ravi Kesarkar

    माफ करा अणे साहेब पण विदर्भाच्या वाट्याचे पैसे पश्चिम महाराष्ट्र चोरत होता तेव्हा आपण काय करत होता ?आणी बाकीचे इतर झोपले होते काय साहेब ?

close