ऊसतोड कामगारांसाठी दुष्काळात तेरावा महिना

March 26, 2016 8:20 PM0 commentsViews:

अनिल तळगुळकर , कोल्हापूर – 26 मार्च : पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची धुराडी बंद पडलीयेत, त्यामुळे विदर्भ-मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांना आपापल्या गावी रिकाम्या हाती परताव लागतंय. पोटापाण्यासाठी हे ऊसतोड कामगार आपल्या मुलांबाळासह 5 महिने पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांमध्ये येऊन राहतात आणि हंगाम संपला की परतीला लागतात.

dsadasday

भाकरीत चंद्र शोधणारे हे मराठवाडा-विदर्भातले ऊसतोड कामगारांनी काल उभ्या केलेल्या संसाराचा पसारा आज आवरायला घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात हातावर पोट भरण्यासाठी आलेली ही कुटुंब आता गावाकडं निघाली आहेत.

या ऊसतोड कामगारांच्या पदरी पडलेलं अठराविश्व दारिद्र्य आणि पोट भरण्यासाठी पायी बांधलेला भोवरा सुटता सुटत नाही. आयुष्यासाठी चाललेल्या या भटकंतीचा परिणाम त्यांच्या मुलाबाळांच्या आयुष्यावरही होतोय. ना धड त्यांना पोटाला अन्न मिळतंय, ना शिक्षण.

रोटीसाठी माती सोडलेली माणसं पुन्हा आपल्या गावी चाललीत खरी, पण तरीही त्यांच्या आयुष्याची फरपट सुरुच राहणार आहे. विदर्भ-मराठवाड्यात पाणी नाही. त्यामुळे पोटा-पाण्यासाठीचा त्यांचा संघर्ष त्यांना करावाचा लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close