राजस्थान आणि बंगलोर आमने-सामने

March 18, 2010 2:32 PM0 commentsViews: 4

18 मार्च आयपीएलमध्ये आज मॅच रंगतेय ती राजस्थान रॉयल्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्समध्ये. बंगलोरने किंग्ज एलेव्हन पंजाबचा पराभव करत स्पर्धेत आपले खाते उघडले. तर स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी राजस्थानला आजची मॅच ही जिंकावीच लागणार आहे. लागोपाठ दोन मॅचेसमध्ये पराभव… तर दोन महत्त्वाचे प्लेअर्स दुखापतग्रस्त… राजस्थान रॉयल्सना चांगल्या कामगिरीसाठी नवीन प्रेरणास्थान शोधण्याची गरज आहे..आणि स्पर्धेत राहण्यासाठी त्यांना आजची मॅच जिंकावी लागणार आहे…मागच्या मॅचमध्ये टीमच्या योजना व्यवस्थित होत्या. पण मैदानात त्यांचा नीट वापर झाला नाही. पण आजच्या मॅचमध्ये असे होणार नाही याची काळजी घेऊ, असे राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन शेन वॉर्न याने म्हटले आहे. पहिल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध एकतर्फी पराभव पत्करावा लागल्यानंतर बंगलोर रॉयलने धैर्य सावरत पुढची मॅच जिंकली. आपल्या बॅटींगमध्ये टीमने कमालीची सुधारणा केली. किंग्ज एलेव्हन पंजाबविरूद्ध 200 रन्सचे टार्गेट पार करत त्यांनी बॅटिंगचा दबदबा दाखवला. आता राजस्थानविरूद्धच्या मॅचमध्ये टीमला बॉलर्सकडून अपेक्षा आहे.आत्तापर्यंतच्या आयपीएल स्पर्धेत बंगलोरच्या विरूद्ध राजस्थानचे पारडे जड आहे. त्यांनी बंगलोरविरूद्ध आत्तापर्यंत खेळलेल्या 4 मॅचपैकी 3 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे या मॅचमध्येही विजय मिळवण्यासाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक आहे.

close