महिला सहकार्‍याच्या विनयभंगाप्रकरणी ‘भाजयुमो’ अध्यक्षाची हकालपट्टी

March 26, 2016 9:51 PM0 commentsViews:

 

ganesh pande

मुंबई – 26 मार्च : भारतीय जनता युवा मोर्चाचा मुंबई शहराध्यक्ष गणेश पांडेय याच्या विरोधात संघटनेतील सहकारी तरुणीने गंभीर आरोपाची तक्रार करताच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गणेश पांडेयची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

मथुरेत एका परिषदेनिमित्त आलेले सर्व कार्यकर्ते एका हॉटेलमध्ये उतरले होते. 4 मार्च रोजी गणेश पांडेय याने रात्रीच्या सुमारास त्याच्या खोलीत बोलावले. मला काही अश्लिल भाषेत प्रश्न विचारले. त्यावेळी मी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना माझा हातही पकडला, अशी तक्रार तरुणीनं आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या पत्राची गंभीर दखल घेत आशिष शेलार यांनी पांडेय याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजपचा मुंबई अध्यक्ष या नात्याने मी आणि मुंबईचे संघटनमंत्री सुनील कर्जतकरांनी पीडित तरुणीचे म्हणणे ऐकून घेतले. महिलाबद्दल झालेल्या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून पांडेय याचा राजीनामा घेतला आहे. तसेच ही बाब अत्यंत गंभीर असल्याने मुंबईची युवा मोर्चाची कार्यकारणीही बरखास्त करण्यात आल्याची घोषणा आशिष शेलार यांनी यावेळी केली.

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याचे अयोग्य वर्तन ?
महिला भाजप पदाधिकार्‍याशी कथित गैरवर्तनानंतर भाजपायुमोच्या गणेश पांडेच पक्षातून निलंबन
– भाजप युमोची मुंबई कार्यकारिणी बरखास्त
– आपल्याला आक्षेपार्ह्य प्रश्न विचारल्याची महिला पदाधिकार्‍याची तक्रार
– अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील
– भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती
– प्रसिद्धिपत्रक काढून दिली माहिती

पीडित तरूणीची आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार -

प्रति,

माननीय आमदार,

श्री. आशिष शेलार

मथुरेतल्या कार्यक्रमासाठी डान्सची प्रॅक्टिस सुरु असताना गणेश पांडेनं मला बोलवण्यासाठी माणसं धाडली. मी नकार दिला असता ते
मला जबरदस्तीने गणेश पांडेच्या रुमवर घेऊन गेले. गणेश पांडे मद्यपान करत होता. तिथं त्यानं माझ्याशी अश्लिल भाषेत संभाषण सुरु
केलं.

मी माझ्या रुमकडे निघाले असता गणेश पांडेनं माझा हात पकडला. मात्र, मी त्याचा हात पिरगळून त्याला म्हटलं, गणेशजी ऐसी फिजिकल मस्ती नहीं करना कभी.

पीडित महिला

कोण आहे गणेश पांडे?

गणेश पांडे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गटाचा समर्थक.
1998 पासून भाजपचा वॉर्ड अध्यक्ष.
2007 ते 2010 पर्यंत उत्तर-मध्य मुंबईचा जिल्हाध्यक्ष.
2013 मध्ये मुंबईचा उपाध्यक्ष होता.
2014 मध्ये भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष बनला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close