कर्नाटकमध्ये भीषण अपघातात मराठवाड्यातील 6 मजूर ठार

March 27, 2016 2:01 PM0 commentsViews:

karantak34कर्नाटक -27 मार्च : विजापूरमध्ये ट्रॅक्टर आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मराठवाड्यातल्या 6 मजुरांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहे. या अपघातातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातल्या होर्टी गावाजवळ हा अपघात झाला. हे सगळे मजूर ऊसतोडणी करून मराठवाड्यात परतत होते. रात्री 2च्या सुमाराला एका कंटेनरनं ट्रॅक्टरला धडक दिली. जखमींवर विजापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close