पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानचं तपास पथक दिल्लीत दाखल

March 27, 2016 1:59 PM0 commentsViews:

pak_team_pathankoat27 मार्च : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानातून संयुक्त तपास पथक भारतात दाखल झालंय. त्यामध्ये पाच अधिकारी, त्यात ISI च्या अधिकार्‍यांचाही समावेश आहे. आज आणि उद्या एनआयए या अधिकार्‍यांना माहिती देणार आहे.

मंगळवारी हे पथक पठाणकोटला जाणार आहे. उद्या ते दिल्लीमधल्या एनआयएच्या मुख्यालयाला भेट देणार आहे. या हल्ल्यानंतर भारतानं गोळा केलेले पुरावे आणि तपासातली प्रगती याची हे पथक पाहणी करणार आहे. मंगळवारी हे पथक पठाणकोटला जाणार आहे, पण हवाई तळावर त्यांना मर्यादित ठिकाणीमध्येच प्रवेश दिला जाणार आहे. बुधवारी हे पथक दिल्लीला परत येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close