कन्हैय्या कुमारला पुण्यात बोलावणारच, रानडे आणि फर्ग्युसनचे विद्यार्थी ठाम

March 27, 2016 4:21 PM0 commentsViews:

KANHAIYA-KUMAR-facebookपुणे – 27 मार्च : कन्हैय्या कुमारला पुण्यात बोलावणारच अशी भूमिका पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूट आणि फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. परंतु, कन्हैय्या कुमारला कॅम्पसमध्ये बोलावून कार्यक्रम घेण्यास कुलगुरूंनी मनाई घातली आहे.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये बनावट देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणामुळे चांगलाच वाद गाजला होता. त्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी आणि देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैयाकुमारला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये बोलवणार असल्याचं विद्यार्थी संघटनांनी जाहीर केलं होतं. मात्र, कन्हैया कुमारला पुण्यात बोलवलं तर याद राखा अशी धमकी भारतीय जनता युवा मोर्चानं दिली होती. त्यावर रानडे आणि फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कन्हैय्या कुमारला बोलावणारच अशी ठा भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. मात्र, कॉलेजेसच्या कॅम्पस आणि विद्यापीठ आवारात कार्यक्रम घ्यायला कुलगुरूंनी परवानगी नाकारली आहे. या प्रकरणात समविचारी संघटनांना सोबत घेणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close