अण्णांचा मुख्यमंत्र्यांना नकार

March 18, 2010 3:13 PM0 commentsViews: 1

18 मार्च ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अण्णांना फोन करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अण्णांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याचे आश्वासनही दिले. पण समाधानकारक तोडगा निघेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे अण्णांनी मुख्यमंत्र्यांना बजावले आहे. दरम्यान मध्यस्थीची चर्चा करण्यासाठी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात राळेगणसिद्धीला गेले आहेत. त्यांनी अण्णांची भेट घेतली आहे. सरकारने पतसंस्था आणि ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, धान्यापासून दारु निर्मितीचे धोरण ठरवावे आणि मंत्रालयातील केबिनच्या सजावटीचा खर्च त्या त्या मंत्र्याकडून वसूल करावा या अण्णांच्या मुख्य मागण्या आहेत.

close