डोंबिवलीकर सुदीपने साकारला ‘ब्रिक्स’चा लोगो !

March 27, 2016 6:55 PM0 commentsViews:

मुंबई – 27 मार्च : या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘ब्रिक्स’ देशांची शिखर परिषद भारतामध्ये होतेय. त्याच्या बोधचिन्हाचं अनावरण नुकतंच दिल्लीमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झालं. हा लोगो सुदीप गांधी या 23 वर्षांच्या मराठमोळ्या डोंबिवलीकर तरुणानं साकारलाय.sundeep_gandhi3

परिषदेचा लोगो डिझाईन करण्यासाठी केंद्र सरकारनं ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी देशभरातून 1400 हून अधिक जणांनी आपले डिझाईन्स पाठवली होती.. त्यापैकी सुदीपनं डिझाईन केलेला लोगो अव्वल ठरला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते सुदीपला सन्मानचिन्ह आणि 50 हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं. ‘ब्रिक्स’ची मुख्य परिषद 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी गोव्याची राजधानी पणजीत होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close