अंधश्रद्धेविषयी जनजागृती मोहीम

March 18, 2010 3:31 PM0 commentsViews: 2

18 मार्च महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेच्या नावाखाली नरबळी देण्याचे किंवा अघोरी प्रथा पाळण्याचे प्रकार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील भाटवडे गावात लहान मुलांना 50 फूट विहिरात खोल सोडण्याचा अजब प्रकार सुरू होता. रोगराईपासून या मुलांचे रक्षण करण्यासाठी ही प्रथा पाळली जात असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे होते. 'आयबीएन-लोकमत'ने ही बातमी काल दाखवली. त्यानंतर या प्रथेविरोधात जिल्हाधिकार्‍यांनी मोहीम सुरू केली. गावकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी या गावात आज जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामसभा घेतली. आणि लोकांना कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी न घालण्याचे आवाहन केले.

close