दुष्काळाचा आणखी एक बळी, टँकरखाली सापडून मुलाचा मृत्यू

March 27, 2016 8:36 PM0 commentsViews:

nanded3432नांदेड – 27 मार्च : मराठवाड्यातील पाणीटंचाईने आणखी एक बळी घेतलाय. पाण्याच्या टँकरखाली सापडून एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. नवनाथ बागल असं या मुलाचं नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील काकांडी इथं ही घटना घडली.

5 हजार लोकसंखेच्या काकांडी गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. 4 टँकरने 8 फेर्‍या करुन इथं पाणी पुरवठा करण्यात येतोय. पण हा पाणिपुरवठा अत्यंत तोकडा आहे. तेंव्हा गावात टँकर आल्यावर पाणी घेण्यासाठी झुंबड उडतेय. दुपारी 1 च्या सुमारास पाण्याचे टँकर आले होते. चालत्या टँकरवर चढून त्यात पाईप टाकण्याच्या प्रयत्नात खाली पाडून नवनाथ बागल हा टँकरच्या चाकाखाली सापडला गेला. चाकाखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. बागल दाम्पत्यांना नवनाथ हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे गावात शोककळा पसरलीये. दरम्यान, शिवसेनेचे आमदर हेमंत पाटील यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. मराठ्वाड्यात यंदा भीषण पाणी टंचाई असल्याने अश्याप्रकारे पाण्यासाठी कोणाचा बळी गेल्यास त्यास शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close