उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

March 27, 2016 4:50 PM0 commentsViews:

utra27 मार्च : शासकीय यंत्रणा विस्कळीत झाल्याच्या कारणावरून केंद्रातील मोदी सरकारने आज उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. सत्ताधारी काँग्रेसमधील आमदारांच्या बंडखोरीनंतर सध्या उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवटीचा वादग्रस्त निर्णय घेण्यात आलाय.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 नुसार यासंदर्भातील जाहीर घोषणेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार आज सकाळी हरीश रावत प्रणित सरकार बरखास्त करून विधानसभा निलंबित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी दिल्लीत शनिवारी रात्री तात्काळ बैठक घेतली. या निर्णायक बैठकीसाठी पंतप्रधान मोदी हे आसामचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close