संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे संघावर टीका

March 28, 2016 10:14 AM0 commentsViews:

मुंबई – 27 मार्च :  राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या स्वतंत्र विदर्भानंतर वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीमुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उडी घेतली आहे. राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.

Raj cartoon

या व्यंगचित्रात संघाची एक व्यक्ती राज्याच्या पाचही विभागांना एकमेकांपासून दूर करताना दिसते आहे. यामध्ये एका बाजूला मराठवाडा आणि विदर्भ, तर दुसर्‍या बाजूला कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र दिसत आहेत. तर एक मुस्लीम आणि दोन ख्रिश्चन व्यक्ती दाखवल्या असून त्या संघाच्या व्यक्तीला उद्देशून बोलत आहे, ‘आम्ही तुमच्या धर्मातील माणसं तोडतो, पण तुम्ही तर तुमच्याच राज्यातली माणसं एकमेकांपासून तोडता! मग तुमच्यात आणि आमच्यात फरक तो काय?’ अशी टीका या व्यंगचित्राव्दारे करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close