63व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट

March 28, 2016 12:53 PM0 commentsViews:

CenNwdvWwAAAT7l

28 मार्च :  गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा एस. राजामौली यांचा भव्यदिव्य चित्रपट ‘बाहुबली’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, ‘बाजीराव-मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारावर महानायक अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत यांनी नाव कोरलं आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. दिग्दर्शक रमेश सिप्पी, सतीश कौशिक यांनी 63 व्या राष्ट्रीय पुरस्काराची यादी माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपूर्त केली. रमेश सिप्पीसह 11 जणांच्या परिक्षण मंडळाने या परस्कारांची निवड केली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांना ‘पीकू’ चित्रपटातील हटके भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर आहे. तर, सलग दुसर्‍या वर्षी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणार्‍या कंगना रानावतला ‘तनु वेड्स मनू रिटर्न’मधील डबल रोलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ‘रिंगण‘ चित्रपटाची निवड झाली. याशिवाय, ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील गायनासाठी महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट गायक म्हणून निवडण्यात आले.

विजेत्यांची यादी…
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत ‘रिंगण’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
चित्रपट प्रेमी राज्य - गुजरात
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर - रेमो डिसुजा (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट – पायवाट
बेस्ट शॉर्ट फिल्म – अमोल देशमुख – औषध
सर्वोत्कृष्ट  हिंदी सिनेमा - दम लगा के हइशा
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट – दारवठा (मराठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) – कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट गीतकार – वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हइशा
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महेश काळे (कट्यार काळजात घुसली)
विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट)
प्रॉडक्शन डिझाईन – सुजीत सावंत (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट संवाद – जुही चतुर्वेदी (पिकू), हिमांशू शर्मा (तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट पॉप्युलर फिल्म - बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) – विशाल भारद्वाज (तलवार)
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close