मनसे बनला प्रादेशिक पक्ष

March 18, 2010 4:42 PM0 commentsViews: 11

18 मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता अधिकृतपणे प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने आज मनसेला याबाबत रितसर पत्र पाठवले आहे. मनसे आत्तापर्यंत रजिस्टर्ड पण अधिकृत मान्यता नसलेला पक्ष होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी लागणार्‍या अटी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे 1968 च्या कायद्यानुसार मनसेला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. आता मनसेला रेल्वे इंजिन ही निवडणूक निशाणी कायमस्वरुपी मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना आयोगाकडून नंतर काढण्यात येईल.

close