राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण, धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण

March 28, 2016 1:43 PM0 commentsViews:

fausdfj

नवी दिल्ली – 28 मार्च :  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘पद्म’ पुरस्कारांचे प्रदान करण्यात येत आहेत.  दिवंगत धीरूभाई अंबानी, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अभिनेते अनुपम खेर यांच्यासह देशातील 56 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

रिलायन्स इंडस्ट्रिजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना 14 वर्षांनंतर मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले. धीरुभाई यांची पत्नी कोकिलाबेन अंबानी यांनी हा सन्मान स्विकारला. तर आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर, नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती, अविनाश दीक्षित, जगमोहन, अभिनेता रजनीकांत यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू स्वर्गीय दयानंद सरस्वती यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. हाफिज सोराब काँट्रक्टर, बरजिंदर सिंह हमदर्द, अनुपम खेर, पालनजी मिस्त्री, सायना नेहवाल, विनोद राय, अल्ला वेकट रामाराव, अॅड. उज्वल निकम, उदीत नारायण, राम सुतार, प्रा. रामनुज ताताचार्य यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, अजय देवगण, माइलस्वामी अन्नादुरई, दीपिका कुमारी आणि प्रसिद्ध शेफ मोहम्मद इम्तिफाज कुरैशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close