आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यार्‍यांचे हात भ्रष्टाचारानं बरबटलेले -रामदास कदम

March 28, 2016 5:04 PM0 commentsViews:

kadam_somiya3मुंबई – 28 मार्च : देवनार डम्पिंग ग्राऊंडवर लागलेल्या आगीप्रकरणी आता राजकारण रंगू लागलंय. आज (सोमवारी) शिवसेनेच्या नेत्यांनी देवनारला भेट देवून भाजपला प्रत्युत्तर दिलं. भाजप आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत असेल तर त्यांचेही हात भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत, कारण ते आमच्या सोबत सत्तेत आहेत अशी टीका सेनेचे नेते रामदास कदम यांनी केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार राहुल शेवाळे आणि आयुक्त अजोय मेहेता उपस्थित होते.

रविवारी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी देवनारला भेट दिली होती. यावेळी त्यांनी आंदोलनही केलं. देवनार कचरा डेपोमध्ये भ्रष्टाचार झालाय असा गंभीर आरोप त्यांनी सेनेवर केला होता. शिवसेनेचा सत्तेत आहे. सर्व निर्णय सेना घेत असते त्यामुळे देवनार आगीची जबाबदारीही शिवसेनेनं घ्यावी अशी टीका सोमय्यांनी केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close