महागाई भत्त्यात 8 टक्के वाढ

March 19, 2010 10:12 AM0 commentsViews: 86

19 मार्चकेंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी असलेल्या महागाई भत्त्यात 8 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता महागाई भत्ता 27 टक्क्यांवरून वाढवून 35 टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्ता 10 टक्क्यांनी वाढवण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. निवृत्तीवेतनधारकांनाही ही वाढ लागू करण्यात येणार आहे. सहाव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसारच ही वाढ करण्यात आली आहे, असे माहिती आणि प्रसारणमंत्री अंबिका सोनी यांनी स्पष्ट केले आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून महागाई भत्त्यातील वाढीचा फरकही कर्मचार्‍यांना मिळणार आहे.

close