‘होमगार्ड’मध्ये भ्रष्टाचार, विना ड्युटी फुल्ल पगारी !

March 28, 2016 6:35 PM1 commentViews:

रणधीर कांबळे -मुंबई, 28 मार्च : पोलीस दलाला राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदतगार होईल, या उद्देशानं होमगार्डची स्थापना करण्यात आलीये. मात्र आता हे दल म्हणजे काही दलाल आणि प्रशासनातल्या लोकांसाठी भ्रष्टाचाराचं कुरण झालंय. त्यामुळेच ड्युटीवर हजर न राहताच काहींच्या नावानं बिलं निघत आहेत. त्याबाबतची कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती आली आहेत. इथे कसा भ्रष्टाचार होतोय त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट…home gurd3

नवरात्र उत्सव, गणेशोत्सव अशा सार्वजनिक सणांच्या काळात मुंबईत पोलीस बंदोबस्तासह इतर अनेक सुरक्षा दलं मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात असतात. त्यामधलंच एक दल म्हणजे होमगार्ड. पण, गेल्या नवरात्र आणि गणेश उत्सवात काही होमगार्डनी कर्तव्यावर हजर नसतानाही भत्ते लाटलेत. त्यामध्ये प्रशासनातले काही अधिकारीही सहभागी असल्याच्या तक्रारी होमगार्डचे उपमहासंचालकांकडे करण्यात आलीय.

गणेशोत्सव, नवरात्र महोत्सवात होमगार्डची जी बिलं अदा केली आहेत. त्यासाठी माहिम, दादर, घाटकोपर, कुर्ला आणि वरळी पोलीस स्टेशनच्या नावे खोटी प्रमाणपत्रं सादर करण्यात आली आहेत. तसा अहवालच उपमहासंचालकांच्या कार्यालयाकडे सादर झालाय. त्यामुळे यात मोठ्या रॅकेटचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय. त्याप्रमाणे तशी चौकशी सुरू करण्यात आलीय. गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक दले हजर असतात, मात्र जितके होमगार्ड असल्याचं दाखवून बिलं काढली जातात, त्यापेक्षा कमी होमगार्ड तैनात असतात. गणेशोत्सव मंडळांनाही होमगार्डची कमतरता जाणवत असते.

हे कागदपत्र आहेत हजेरी पटाचे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावेळी हजर असणार्‍या होमगार्डचे. यामध्ये कविता बोराडे या 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या दरम्यान विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तृव्यावर हजर असल्याचं दिसतंय. मात्र, माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रावरून त्या याच काळात मुंबई विद्यापीठात ड्युटीवर हजर असल्याचं दिसतंय. यावरून भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर गेली आहेत त्याचा अंदाज येतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • Prakash Patil

  होमगार्डमधील
  भ्रष्टाचाराबाबत आपण बातमी दिली खरी, परंतु संपूर्ण बातमीमध्ये केवळ एकाच
  व्यक्तीचे नाव वाचल्यानंतर असे वाटते की, या व्यक्तीच्या संदर्भातच बातमी
  असावी. बातमीदार श्री. रणजित कांबळे यांनी होमगार्ड संघटनेबद्दल काय माहिती
  आहे, या होमगार्डची घटना काय आहे, होमगार्डचे काम कशा स्वरूपात चालते
  याबाबत माहिती घेतली असावी. आणि असे जर असेल तर त्यांनी अशी बातमी देताना
  या भ्रष्टाचारामध्ये संबंधित सर्वांचीच नावे नमूद केली असती. तसे न
  झाल्याने केवळ एका व्यक्तीचे नाव नमूद करणे म्हणजे या व्यक्तीच्या बाबतीत
  असलेला पूर्वग्रहदूषीतपणा किंवा केवळ या व्यक्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न
  त्यांनी आयबीएन लोकमतसारख्या अतिशय लोकप्रिय असलेल्या वार्तापत्रात उघड
  केला आहे, असे निदर्शनास येते.

close