हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या,सेनेचं भाजपला आव्हान

March 28, 2016 6:52 PM0 commentsViews:

uddhav on modi_land_bill28 मार्च : हिंमत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या असं आव्हानच शिवसेनेचं भाजपला दिलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकात अशी मागणी केल्याचं समजतंय. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याबद्दल पत्रक प्रसिद्ध केलंय.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची हिंमत मोदी सरकारनं दाखवायला हवी, याआधी सावरकरांच्या अवमानाबद्दल शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली तेव्हा आमच्या आंदोलनापासून लांब राहिलेले आज सावरकरांसाठी आंदोलन करत आहेत असा टोला पत्रातून शिवसेनेनं भाजपला दिला. तसंच आतापर्यंत सावरकरांना भारतरत्न न देऊन काँग्रेसने सर्वच क्रांतिकारकांचा अवमान केला. या अवमानाबद्दल काँग्रेसने माफी मागावी नाहीतर भाजप मुंबईतील काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असा इशारा दिला होता. पण, भाजपने असलं ढोंग करू नये, सावरकरांना भारतरत्न देऊन बदनामी मोहिमेचे ढोंग बंद पाडा मग आंदोलनाची गरज पडणार नाही अशी टीकाही करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close