आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या विधवा पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

March 28, 2016 7:19 PM0 commentsViews:

osmanabad33उस्मानाबाद – 28 मार्च : जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नीनी आज अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. स्टेट बँकेने अनुदानाची रक्कम कर्जात जमा केल्याने आणि कर्जचा तगादा लावल्याने या विधवा महिलेनं हे पाऊल उचललं आहे.

कळंब तालुक्यातील मंगरूळ इथले शेतकरी राजेंद्र माने यांनी दुष्काळामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 2015 रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया,मंगरूळ शाखेचं 1 लाख 75 हजार कर्ज आहे. शेतकर्‍यांच्या मृत्यूनंतर शासनाने 1 लाख रूपये सानुग्रह अनुदान दिलं होतं. पण कर्जाची रक्कम 1 लाख 75 हजार रूपये माफ केले नव्हती. त्यामुळे संतापलेल्या सुरेखा माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close