भाज्यांच्या टोप्या घालून मनसे आमदारांचे आंदोलन

March 19, 2010 10:26 AM0 commentsViews: 2

19 मार्चविधानसेभचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. आणि या अधिवेशनात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्याचा चंगच मनसेने बांधला आहे.काल मनसेचे आमदार काळ्या टोप्या घालून बग्गीतून विधानभवनापर्यंत आले होते. तर आज हे आमदार भाज्यांच्या टोप्या घालून आले. वाढत्या महागाईच्या विरोधात मनसेने हे आंदोलन केले. भाज्यांच्या टोप्या घालून महागाईविरोधात घोषणा देतच मनसे आमदारांनी विधानभवनात प्रवेश केला.

close