महिलेला अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

March 28, 2016 9:16 PM0 commentsViews:

सांगली – 28 मार्च : जिल्ह्यातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल झालाय. अनैतिक संबध ठेवल्याच्या कारणावरून एका महिलेला आणि एका पुरुषाला लोकांसमोर मारहाण होत असल्याचं यात स्पष्टपणे दिसतंय.

sangali_videoसांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छींद्रगड इथे ही घटना दोन ते अडीच वर्षांपूर्वी घडली. हा व्हिडिओ गोपाळ समाजातील लोकांचा असून महिलेच्या नवर्‍याने मारहाण केली आहे. गावातील लोकांच्या माहितीनुसार आता ते दोघे नवरा-बायको एकत्र नांदत आहेत. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात अजून कोणताही गुन्हा दाखल नाही. पण हा व्हिडिओ कालपासून सांगली, सातारा, कराड या भागात
व्हॉट्सऍपवर फिरतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close