कुर्ल्यात एडक्यांच्या झुंजीवर सट्टा, 12 जणांना अटक

March 28, 2016 9:08 PM0 commentsViews:

मुंबई – 28 मार्च : सगळीकडे विश्वचषक क्रिकेटवर सट्टेबाजी सुरू असतानाच कुर्ला इथं एडक्यांच्या झुंझीवर सट्टा खेळणार्‍या बारा जणांना कुर्ला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 28 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.aedka4

या ठिकाणी एडक्यांच्या झुंझीची मोठी स्पर्धा खेळली जाते. विशेष म्हणजे हा सट्टा लाखोंच्या किंमतीत खेळला जातो. या सर्वांकडून 28 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. कुर्लाच्या कपाडियानगर मधील मैदानात ही स्पर्धा सुरू होती. या मध्ये ऐडक्यांवर ज्याने  कोणी पैसे लावले असतील त्यांना स्पर्धा खेळवणार्‍या आयोजकांना ठरल्यानुसार रक्कम द्यावी लागते.

या झुंझी 2 ते 3 मिनीटं खेळवतात, जे ऐडके लढताना पळून जातात अथवा पडतात ती हरतात. या स्पर्धेत वारंवार ऐडक्यांच्या झुंझीमुळे ऐडक्याचा मृत्यू ही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतल्या कुर्ला, डोंगरी, जोगेश्वरी, मीरारोड या ठिकाणी या स्पर्धा खेळल्या जातात. विशेष सूञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे ऐडके पाकिस्तानहून जम्मू काश्मिर मार्गे पंजाबला आणल्या जातात त्यानंतर ते मुंबई आणल्या जातात. ऐडक्यांचा सर्व व्यवहार ऑनलाईन होतो. ऐडक्यांना पाहून त्यांची किंमत ठरवली जाते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close