राजस्थान विधानसभेत झटापट

March 19, 2010 10:35 AM0 commentsViews: 2

19 मार्चआज राजस्थान विधानसभेत मार्शल आणि आमदार यांच्यात जोरदार झटापट झाली. यात 2 आमदार जखमी झाले आहेत. भाजपचे आमदार राजेद्रसिंह राठोड यांचे निलंबन झाल्याच्या प्रकरणावरुन भाजपचे इतर आमदार गोंधळ घालत होते. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला होता.अध्यक्षांनी विनंती करूनही हे आमदार ऐकायला तयार नव्हते. अखेर या आमदारांना आवरण्यासाठी मार्शल्सना सभागृहात बोलवण्यात आले. त्यानंतर या आमदारांना शांत करण्याच्या झटापटीत भाजपचे दोन आमदार जखमी झाले.

close