गणेश पांडेसोबत विनोद तावडेंनाही अटक करा -नवाब मलिक

March 28, 2016 10:41 PM0 commentsViews:

28 मार्च : मुंबईतल्या भाजयुमो कार्यकर्तीच्या विनयभंग प्रकरणाचे आता गंभीर राजकीय पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात आता शिक्षण मंत्री विनोद तावडेंवरही राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केले आहे. तावडेंचा त्या पत्रात उल्लेख असून त्यांनाही पांडेसह अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलीये.malik_tawade

मथुरेत 3 ते 5 मार्च दरम्यान मुंबई भाजयुमोचे तत्कालीन अध्यक्ष गणेश पांडे याने माझ्याशी असभ्य व्यवहार केला, असा आरोप एका महिला पदाधिकारीने केलाय. या पत्राची दखल घेत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गणेश पांडेची पक्षातून हकालपट्टी केली. पण अजूनपर्यंत पोलिसांत तक्रार का नाही, असा सवाल विरोधकांनी विचारलाय. मनसेनं पोलीस ठाण्यावर आज मोर्चा काढला तर शिवसेनेने परिषदेत मागणी केली.

त्यातच या प्रकरणाला आता नवं राजकीय वळण लागलंय. या पत्रात पीडित महिलेने विनोद तावडेंच्या उल्लेख केलाय. तुला विनोद तावडेंनी सोडलं पण मी सोडणार नाही असा उल्लेख पांडेनं केलाय असा खुलासा नवाब मलिक यांनी केलाय. त्यामुळे हे प्रकरण अंतर्गत चौकशीचे नसून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून गणेश पांडे आणि विनोद तावडे यांना अटक करावी अशी मागणी नवाब मलीक यांनी केलीये.

पण, तावडेंचा उल्लेख चांगल्या अर्थाने केलाय, त्यांच्यावरचे आरोप हास्यास्पद आहेत, असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आशिष शेलार यांना महिलांचा आदर कसा करावा, याविषयी भाजपने शिबिर घ्यायला हवं असा सल्लावजा टोला लगावलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close