ब्रसेल्स बॉम्बस्फोटात बेपत्ता झालेल्या भारतीयाचा मृत्यू

March 28, 2016 11:03 PM0 commentsViews:

Raghvendra Ganeshan Brusell28 मार्च : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं झालेल्या बॉम्बस्फोटात एका भारतीयाचा मृत्यू झाल्याचं निश्चित झालंय. राघवेंद्र गणेशन यांचा ब्रसेल्स हल्ल्यानंतर शोध सुरू होता. यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय.

राघवेंद्र हा इन्फोसिसचा कर्मचारी होता. 4 वर्षांपूर्वी तो पुण्यातल्या इन्फोसिसमध्ये कार्यरत होता. त्यानंतर तो ब्रसेल्समध्ये एका प्रकल्पासाठी गेला. बॉम्बस्फोट होण्याच्या 1 तासापूर्वी त्याचा त्याच्या आईशी संपर्क झाला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गणेशन यांचा शोध सुरू असल्याचं ट्विट केलं होतं. अखेर आज त्यांचा मृत्यू झाल्याचं निश्चित झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close