पंजाबात गहू सडतोय

March 19, 2010 10:42 AM0 commentsViews: 41

19 मार्चकेवळ साठवण्यासाठी जागा नसल्याने पंजाबमध्ये सुमारे 600 दशलक्ष टन गहू सडल्याचे निदर्शनास आले आहे.आणि याबाबत कृषीमंत्र्यांनी राज्यसरकारला जबाबदार ठरवले आहे. गहू साठवण्यासाठी गोडाऊनची गरज असल्याचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांना कळवले होते. त्यावर हा धान्याचा साठा इतर राज्यांमधील गोडाऊनमध्ये साठवला जावा, असे सांगण्यात आले. या गोंधळात अखेर हा 600 टन गहून उघड्यावरच ठेवण्यात आला. अनेक दिवस उघड्यावर राहिल्याने हा गहू अखेर खराब झाला. देशभरात अन्नधान्यांचे वाढलेले भाव बघता इतक्या मोठ्या प्रमाणात पंजाबमध्ये गहू वाया गेल्याने केंद्र आणि राज्यसरकारवर टीका होत आहे.

close